शिवाई-8
- Author: सौ. वर्षा प्रसाद जोशी
- ISBN: 978-93-92801-12-9
- Edition: First
- Publisher: Five Fingers
Summary: कोणतीही भाषा ही उच्चार आणि लेखन यावर आधारित असते. इंग्रजी माध्यमाच्या मुलांना बरेचदा मराठी भाषेतील लेखन आणि स्पष्ट उच्चार कठीण वाटतात; परंतु देवनागरी लिपीचा परिचय असलेले विद्यार्थी थोड्या प्रयत्नात मराठी सहज लिहू व बोलू शकतात. इंग्रजी माध्यमाच्या मुलांना व त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना या पुस्तकाद्वारे मराठी भाषेचा अभ्यास करणे निश्चितच सुलभ होईल. आकलन, लेखन, वाचन, उपयोजन या कौशल्यांना अनुसरून हे पुस्तक तयार केले आहे.
शिवाई ची वैशिष्ट्ये :
भाषाभ्यासातील महत्त्वाचा भाग :
• मुळाक्षरांचा परिचय, उच्चार व लेखन. सहज समजतील अशी लहान वाक्ये.
• सरावासाठी जागा.
• प्रत्येक वर्गातील मुलांची आकलन क्षमता लक्षात घेऊन समाविष्ट केलेले पाठ, बोधकथा, कविता, चित्रकथा, विज्ञाननिष्ठ पाठ व मूल्याधारित गोष्टी.
• संवाद, विनोद, वर्गकृतींचा/कलासमाकित कृतींचा समावेश.
• व्याकरण, शब्दसंपत्तीवर आधारित स्वतंत्र पाठ.
• मुलांवर संस्कार करणारे श्लोक, संस्कृतीची ओळख, ऐतिहासिक प्रसंग.
• सरावासाठी भरपूर स्वाध्याय, प्रश्नांची विविधता, प्रत्येक पाठावर नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रकल्प/कृती.
• आकर्षक चित्रे, मुलांच्या बुद्धीला चालना देणारे, त्यांना कृतीशील करणारे उपक्रम, प्रकल्प वर्गकृती.