ज्ञानाई-2
- Author: श्री. संदीप व्हनाळे
- ISBN: 978-93-48089-17-5
- Edition: First
- Publisher: Five Fingers Education Pvt.Ltd.
Summary: या मराठी पाठ्यपुस्तकांच्या मालिकेत मराठी भाषेच्या विविध पैलूंचा अभ्यास मुलांना करून देण्यात आला आहे. मराठी तसेच अमराठी विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशा पाठांचा व कवितांचा यात समावेश करण्यात आला आहे. मराठी साहित्यातील विविध साहित्य प्रकार यात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे सहज भाषाज्ञान होईल, संवाद साधता येतील. या पाठ्यपुस्तक मालिकेमुळे विद्यार्थ्यांचे आपले विचार, भावना व कल्पना अभिव्यक्त करण्याचे कौशल्य विकसित होईल. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधताना श्रवण, वाचन, भाषण, संभाषण, लेखन, सर्जनशीलता या कौशल्यांचाही विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून या मालिकेचे लेखन करण्यात आले आहे. शिक्षण तज्ज्ञ व विषय तज्ज्ञ यांच्याकडून पाठ्यपुस्तकाचे समीक्षण करून आलेल्या सूचना व अभिप्राय यांचा विचार करून पुस्तकाला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.
ज्ञानाई ची वैशिष्ट्ये :
• विद्यार्थ्यांच्या श्रवण, भाषण, संभाषण, वाचन आणि लेखन या मूलभूत भाषिक कौशल्यांचा सर्वांगीण विकास.
• निरीक्षणक्षमता, विचारक्षमता, कल्पनाशक्ती आणि कृतिशीलता विकसित करणारे विविध स्वाध्याय.
• व्याकरण आणि शब्दसंपत्तीचा विकास करण्यासाठी स्वतंत्र पाठ व भाषाभ्यासाचा समावेश.
• स्वमत यांसारख्या प्रश्नांद्वारे विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार मांडण्याची आणि कल्पकतेला वाव देण्याची संधी.
• बुद्धीला चालना देणारे, जिज्ञासा वाढवणारे आणि त्यांना सक्रियपणे सहभागी करून घेणारे उपक्रम व प्रकल्प.
• शिक्षकांच्या मदतीसाठी वेब सपोर्ट मध्ये टेस्ट जनरेटर, वर्कशीट्स, लेसन प्लानर, डिजिटल फ्लिपबुक तसेच टीचर्स हॅण्डबुक (शिक्षकदर्शिका) उपलब्ध.